शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी । प्रतिनिधी
रस्ते सफाई कचरा प्रक्रिया मधील करोडोंचा मलिदा साठी चतुर्थश्रेणी कामगारांची भरती नाही.
मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती बहुजन समाजातील कष्टकरी सफाई कामगार महिलांवर अन्याय होत आहे : बाबा कांबळे…
कष्टकरी सफाई कामगार महिलांचे ह प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन
Covid-19 मुळे सर्व सोळाशे महिला एकत्र आल्यास संसर्ग वाढेल यामुळे विभागावर आठ क्षेत्रीय कार्यालयावर आंदोलन करून मागण्या मान्य न झाल्यास मनपा मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय,
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये रस्ते साफसफाईसाठी सोळाशे महिला कंत्राटी पद्धतीने कामे करत आहेत, गेली वीस वर्षापासून या महिला रस्ते सफाई चे कामे करत आहेत, एखाद्या ठिकाणी कायम कामे असतील तर त्या ठिकाणी ठेकेदार पद्धत बंद करून कंत्राटी कामगारांना कायम केले पाहिजे, असे कामगार कायदा प्रमाणे नियम असताना देखील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मात्र रस्ते साफसफाई घण कचरा प्रक्रियांमध्ये करोडोंचा मलिदा खाण्यासाठी अधिकारी ठेकेदार संगणमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत, त्यामुळे गेली वीस वर्षापासून चतुर्थी श्रेणी कामगारांची भरती केली जात नाही, इतर सर्व विभागात भरती सुरू आहे परंतु चतुर्थी श्रेणी कामगारांची भरती न केल्यामुळे अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय दलित बहुजन समाजातील कष्टकरी सफाई कामगार महिलांवर अन्याय होत असल्याचे मत कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी व्यक्त केले,
कष्टकरी कामगार पंचायत वतीने सफाई कामगार महिलांचे विविध प्रश्नांसाठी ह क्षेत्रीय कार्यालयावर निदर्शने आंदोलन करण्यात आले, पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पंचायत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, अध्यक्ष बळीराम काकडे, जया धोत्रे,स्वाती सोनार, मनीषा जाधव, अनिता मोरे, स्वाती सोडे, प्रभावती सुरते, आदी उपस्थित होते,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रस्ते सफाईसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या आहे, यात संख्यबळा एवजी स्क्वेअर मीटर प्रमाणे रस्ते साफ करण्यासाठी निविदा मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहे,
या निविदेत संख्याबळ नसल्यामुळे ठेकेदार हे कमी मनुष्यबळा कडून जास्त कामे करून घेऊ शकतात, आता गेली वीस वर्षापासून काम करत असलेल्या सोळाशे महिलांपैकी काही महिलांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे, यामुळे कोविड सारख्या काळात सर्वजण घरात असताना सफाई कामगार महिलांची आरोग्य सेवा व्यवस्थित पार पडली आणि आता त्यांना कामावरून कमी करु नये अशी महिलांची आग्रहाची मागणी आहे, यामुळे सोळाशे महिलांनी आंदोलन सुरू केले असून कोविड मुळे संसर्ग वाढू नये यासाठी सर्व सोळाशे महिला एकत्र न येता मनपाच्या 8 क्षेत्रीय कार्यालयावर विभागातून हे आंदोलन करण्यात येणार आहे, आठ क्षेत्रीय कार्यालयावर आंदोलन करून मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी दखल न घेतल्यास पुढील काळात मनपा मुख्य इमारत समोर आंदोलन करणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.
1) सर्व सोळाशे महिलाना कायम करा.
2) रस्ते सफाई घण कचरा प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करा
3) मनपा आयुक्त राजेश पाटील होश मे आयो…होश मे आके बात करो…बात तो तुमको करणी होगी…
अशा घोषणा यावेळी देण्यात आले.