शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीच्या आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपला वाढदिवस हा साजरा न करण्याचा आणि पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की राज्यातील कोरोना महामारीच्या आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे माझ्या हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणते ही जाहीर कार्यक्रम आयोजित करू नये, तसेच मला प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नये , वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनी किंवा डिजिटल स्वरूपात व्यक्त कराव्यात, सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून महाराष्ट्राला कोरोना मुक्त व पुरग्रस्तांना मदतीचा हात देऊन या लढाईत आपले योगदान द्यावे असे आवाहन नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.