शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
मेट्रोच्या (Metro) ट्रायल रनचे (Trial Run) उद्घाटन कोणाच्याही हस्ते होऊ देत, पुणे मेट्रोचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झाले होते. आता उद्घाटनही त्यांच्याच हस्ते होणार, असे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवारी) शिवाजीनगर येथील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, ‘‘देशात सर्वात वेगात पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. सिव्हिल कोर्ट स्टेशन हे मल्टिमोडल हबचं चांगलं मॅाडेल. मेट्रोच्या ट्रायल रनचे उद्घाटन अजित पवार यांनी केले असेल पण यात कोणताही श्रेयवाद नाही. अजित पवार हे पालकमंत्री असल्याने त्यांनी ट्रायल रनचे उद्घाटन केले असले. पण मेट्रोचे उद्घाटन हे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल. त्याला पवार पण नाही म्हणणार नाहीत.