शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा निरीक्षक सौ कविता संदेश आल्हाट यांच्या वतीने त्यांच्या लक्षवेधी स्पोर्ट्स फाउंडेशन अंतर्गत आरोग्यम् धनसंपदा अभियान राबविण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान सदर शिबिर हॉटेल मोशी ग्रँड बँक्वेट हॉल, देहू रस्ता, मोशी येथे संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये जनरल तपासणी, स्तनांची सोनोग्राफी, सुरक्षित व एकांत ठिकाणी महिला तज्ज्ञांद्वारे तपासणी, निर्धोक वेदनारहित आधुनिक तंत्राद्वारे तपासणी, व दुर्दैवाने कॅन्सर झाल्यास पुढील तपासणी , उपचार व शस्त्रक्रिया याबाबत सल्ला मार्गदर्शन केले जाणार आहे.
सदर मोफत कॅन्सर तपासणी शिबिर लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर, चिंचवड यांच्या सहकार्याने होत आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन कविता संदेश आल्हाट यांनी केले आहे.