शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांना पीएच.डी. प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या कार्यालयात सन्मान करण्यात आला. हा सन्मान महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विश्वस्त, सुप्रसिध्द कवि राजन लाखे, उपाध्यक्ष: डॉ रजनी शेठ, कार्याध्यक्ष सुप्रसिध्द लेखिका विनीता ऐनापुरे, कार्यवाह: कवि संजय जगताप आणि सदस्य:कवि श्रीकांत जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सर्व साहित्य संस्थेची मातृसंस्था असलेल्या व ११५ वर्षाची परंपरा असलेल्या ह्या संस्थेच्या शाखेने केलेला हा सन्मान माझ्या व्यक्तीगत जीवनात याला फार महत्त्वाचे असे स्थान निर्माण झाले आहे. न्यायमूर्ती रानडे,न.चिं.केळकर, लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा व सामाजिक समतेचा वारसा या संस्थेच्या पाटिमागे विचार रूपाने आजही भक्कमपणे उभा आहे. या सन्मानाने ठळकपणे दिसून येतो.