शबनम न्युज | दिघी
दिघी | प्रतिनिधी
दिघी मध्ये आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमा साठी दिघीतील पहिली आदिवासी महिला सिताबाई गणपत किर्वे ( उद्योजिका ) राष्ट्रीय आदिम महोत्सव दिल्ली येथे पुरस्कृत यांचे मनोगत व महिला स्वयंरोजगारास मार्गदर्शन कार्यक्रम धेन्यात आला कार्यक्रमात आदिवासी हे जंगल रक्षक व निसर्ग पुजक असल्या कारणाने सर्व मान्यवरांना रोप वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाचे सर्व नियाोजन सामाजिक कार्यकर्ते रमेश चंद्रकांत विरनक व भिमाशंकर नगर मित्रमंडळाने केले होते या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौर हिरानानी घुले , नगरसेवक विकासभाऊ डोळस , नगरसेवीका निर्मलाताई गायकवाड , माजी नगरसेवीका आशाताई सुपे , युवा नेते शशीआण्णा टिंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन भिमाशंकर नगर मित्रमंडळातील विशाल झांजरे , शुभम गवारी , दर्शन गवारी, मारूती दुधे, सुधीर शेळके, आमोल किर्वे , प्रविन शेळके यांनी केले होते.