प्राधिकरण पीएमआरडीए त विलीन झाले पण प्राधिकरणातील नागरिकांत संभ्रम
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमआरडीए मध्ये विलीनीकरण करण्यात आले मात्र या विलीनीकरणानंतर प्राधिकरणातील (पीसीएनटी डीए)लोक संभ्रमावस्थेत आहेत पीएमआरडीए कडे नक्की कोणत्या जबाबदाऱ्या व महापालिकेकडे कोणत्या जबाबदाऱ्या याबाबत संभ्रम असून नागरिकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी अडचणी येत आहेत म्हणून ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य द्यावे पीएमआरडीए शी संबंधित लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दर आठवड्याला जनता दरबाराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे
यासंदर्भात थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की ,दि.१४ मार्च १९७२ रोजी स्थापन झालेले
पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ५० वर्षानंतर विसर्जित झाले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात नवनगर विकास प्राधिकरण विलीनीकरण करण्यात आल्याची अधिसुचना 7 जुलैला प्रसिद्ध झाली. मात्र पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील लोक अजूनही संभ्रमावस्थेत आहेत .एनओसी तसेच तांत्रिक बाबतीत अनेक अडचणी आहेत प्राधिकरणाने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत त्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा कसा देणार हा प्रश्न आहे .महापालिकेकडे ही जबाबदारी असेल तर महापालिकेकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी जागा आहेत का हा ही प्रश्न आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण झाल्यानंतर पीसीएन टीडीएने भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड ,सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड व अतिक्रमण झालेल्या भूखंडाचा ताबा महापालिकेकडे आला आहे .पीसीएनटीडीए च्या सर्व क्षेत्रासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे .नागरी कामांचा खोळंबा होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड मनपाने स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
या कामकाजासाठी महापालिकेने १२ अधिकारी ,कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचे तर भूमी जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील आलमेकर यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचे अधिकार वापरण्यास मान्यता दिली आहे