शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्राध्यापक व विभाग प्रमुख यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सायन्स पार्क येथे भेट दिली असल्याची माहिती सायन्स पार्क चे प्रवीण तुपे यांनी दिली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चे विभाग प्रमुख डॉ बी बी वायकर व डॉ अनिता मुरुगकर यांनी दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क ला भेट दिली. सायन्स पार्क च्या धर्तीवर औरंगाबाद येथे विद्यापीठा मार्फत नियोजित सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क उभारणे कामी सदर भेटी चे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सायन्स पार्क चे प्रवीण तुपे यांनी सायन्स पार्क च्या कामकाजाची विस्तृत माहिती दिली.
विज्ञान प्रचार व प्रसार या अनुषंगाने दोन्ही संस्थांनी एकमेकास सहकार्य करण्याचे ठरविले. या प्रसंगी सायन्स पार्क चे सुनिल पोटे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.