शबनम न्युज | मावळ
मावळ | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महिला, युवक, ओबीसी सेल, अल्पसंख्यांक सेल, सामाजिक न्याय विभाग, विदयार्थी सेल वतीने काल सातारा जिल्ह्यातील कोयनानगर या भागातील मिरगाव, डोकावळे, उंबळी, आंबेघर, बाजे या परिसरात अतिवृष्टीमुळे व डोंगरभाग भुसख्खलनामुळे गावातील काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली व फार मोठ्या प्रमाणावर निसर्ग कोपल्यामुळे मनुष्यहानी झाली यात 16 शेतकरी कुटुंबातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष या भागात जाऊन आपलं कर्तव्य म्हणून एक हात मदतीचा घरगुती साहित्याचे वाटप केले व तेथील नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, मावळ तालुका ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मदत घेऊन गाडी रवाना करण्यात आली.
त्या भागातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकारी यांच्या समोर आपल्या अनेक समस्याबरोबर पुनर्वसन होणे हा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकारी थेट फोनद्वारे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्याशी लगेच संपर्क करत आपल्या समस्या मांडल्या. आमदार सुनिल शेळके यांनी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे सांगितले.
यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर, युवा नेते देवेंद्र शेलार, सरपंच रामभाऊ यमकर यांच्याशी संपर्क करत प्रत्यक्ष घटनास्थळी मदत कार्य पोहचवत मावळ तालुका ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खजिनदार राजेश बाफना, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, पुणे जिल्हा युवक सरचिटणीस विशाल वहीले, मावळ ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश खैरे, उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, मावळ अल्पसंख्यांक अध्यक्ष आफताब सय्यद, मावळ युवक उपाध्यक्ष प्रविण ढोरे, ज्येष्ठ नेते सुनिल शिंदे, वडगाव शहर युवक अध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, वडगाव शहर ओबीसी सेल अध्यक्ष मयुर गुरव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंढरीनाथ ढोरे, विनायक लवंगारे, सुहास विनोदे, विकास कदम, विकास कडू, सोनू पिंजण, प्रथमेश घाग, राहील तांबोळी, शंकर सुतार, संदीप नवघणे, विजय यमकर हे प्रत्यक्ष कोयनानगर येथे मदत कार्यास उपस्थित होते.
या कामी वडगाव शहर अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र कुडे, वडगांव कार्याध्यक्ष सुरेश जांभूळकर, वडगाव शहर महिला अध्यक्षा सौ.मीनाक्षी ढोरे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, राहुल ढोरे, युवा नेते गणेश ढोरे, शरद ढोरे, अमर चव्हाण, शैलेश वहिले, विकी ढोरे यांचे देखील सहकार्य लाभले.
वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती या मध्ये वडगांव येथील किसनराव वहिले, अरुण वाघमारे, सचिन नारायणराव ढोरे, अभिजीत राजेंद्र सुतार, अतुल बाळासाहेब ढोरे, आकाश सुभाष शिंदे, सागर बबनराव कदम, हर्षल पारसमल बाफना, संतोष खैरे, बालाजी ग्रूप, स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान, राजमुद्रा मार्ट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी सदस्यांनी मदतरुपी सहकार्य केले.