शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांचा गौरव समारंभ प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते कोरोना विषयक नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी उपमहापौर नांनी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे , नगरसेवक तुषार हिंगे, विलास मडीगेरी, केशव घोळवे, संतोष लोंढे, सचिन चिंचवडे, शैलेश उर्फ शैलेद्र मोरे मोरेश्वर शेडगे, नगरसदस्या झामाबाई बारणे, अनुराधा गोफणे, शारदा सोनवणे, माधवी राजापुरे, निर्मला गायकवाड, निर्मला कुटे, कमल घोलप, करुणा चिंचवडे, मीनल यादव, अनुराधा गोरखे, साधना मळेकर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.