शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनधी
आज आपण आपल्या देशाचा अमृतमहोत्सवी ७५ वा स्वतंत्र दिन साजरा करत आहोत या स्वतंत्र दिनानिमित्त कोविड योद्धा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कोरोना सारख्या महाभयंकर संकट काळात आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स ,सफाई कामगार यांनी रुग्णांची अविरतपणे सेवा केली त्यांचा सन्मान स्वतंत्र दिनानिमित्त करण्यात आला
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे चिंचवड विभाग प्रमुख किरण ज्ञानेश्वर दळवी यांच्या वतीने कोविड योद्धा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.या कोविड योद्धा सन्मान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते राहुल कलाटे होते. नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते सर्व कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला , यावेळी राहुल कलाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी किरण ज्ञानेश्वर दळवी यांच्या सामाजिक कार्याचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी कौतुक केले तसेच पुढील काळात उत्तमोत्तम समाजोपयोगी उपक्रम किरण दळवी यांनी राबवावे असे राहुल कलाटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी किरण दळवी यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की मागील दोन वर्षापासून कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजारात अनेक रुग्णांचा बळी गेला आहे या काळात या कोरोना रुग्णांची सेवा मनापासून व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता करणाऱ्या कोविड योद्धांचा सन्मान आपण आज जनतेच्या मनातील व आमच्या मनातील आमदार , नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आला याचा आम्हाला मोठा आनंद आहे, नगरसेवक राहुल कलाटे यांनीही माझ्या विनंतीला मान दिला व कार्यक्रमाला हजर राहिले, हा माझ्यासाठी एक मोठा बहुमान आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी समाजोपयोगी उपक्रम यापुढेही राबविणार असल्याचे किरण दळवी यांनी सांगितले
या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक राहुल कलाटे, बाळासाहेब वाल्हेकर,दिलीपजी भोंडवे,हुले सर आदी मान्यवर सहित परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमला यशस्वी करण्या साठी किरण दळवी मित्र परिवार वतीने अथक परिश्रम घेण्यात आले.