शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनधी
आपण आपल्या देशाचा अमृत महोत्सवी 75 वा स्वतंत्र दिन साजरा करत आहोत या स्वतंत्र दिनानिमित्त हा दिवस लहान मुलांसमवेत साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो हा आनंद लुटला आहे राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहर पदवीधर संघ उपाध्यक्ष एजाज चौधरी यांनी. आज 75 व्या स्वतंत्र दिन निमित्त कासारवाडी येथील लहान मुलां समवेत एजाज चौधरी व त्यांच्या मित्रमंडळी यांनी स्वतंत्र दिन साजरा केला तसेच यावेळी चौधरी यांच्या वतीने या लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच तिरंगा रंगाचे फुगे लहान मुलांना वाटण्यात आले यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याजोगा होता एजाज चौधरी यांनी आपल्या देशाचा हा स्वतंत्र दिन लहान मुलां समवेत साजरा करून लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारा एक चांगला संदेश शहरवासियांना दिला आहे
Advertisement