अमृतमहोत्सवी 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, नगरसेवक राजू बनसोडे यांचे आयोजन
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
आपल्या देशाचा अमृतमहोत्सवी 75 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पार्थ पवार फाउंडेशन वतीने ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न झाला, सदर सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांनी केले या कार्यक्रमात प्रथमतः त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला
या कार्यक्रम प्रसंगी आपल्या प्रतिक्रिया देताना नगरसेवक राजू बनसोडे यांनी सांगितले की सर्वांचे मन एकत्रित आणण्यासाठी ज्येष्ठत्व लागते त्यामुळे वयाने अधिक असणाऱ्या ज्येष्ठ आणि ज्ञानाने अधिक असणाऱ्या श्रेष्ठ याची जाणीव आज समाजाला झाली पाहिजे या दृष्टीने 75व्या अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत आम्ही सर्व पार्थ पवार फाउंडेशन च्या वतीने आमच्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करीत आहोत
या प्रसंगी सौ.प्राजक्ता कांबळे (डोईफोडे),कार्यध्यक्ष महिला काँग्रेस जन्नत सय्यद,प्रभाग अध्यक्ष फमिदा शेख,अध्यक्ष सदाशिव रसाळ,तानाजी डोईफोडे,मनोज परदेशी,राजेश केशी,सचिन शिंदे,आकाश नाटेकर,निशांत कामठे,सोमनाथ कामठे,मनोज गुंठे,शंकर गायकवाड,सुशांत वंजारी,तुषार चाळके,आशिष जगताप,आकाश बोरावडे,अंकुश वाघमारे,मोनेश बाजल,फिरोज सय्यद,अमन संकनुर उपस्थित होते