शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
“व्यर्थ न हो बलिदान” या संकल्पने अंतर्गत असंघटित कामगार काँग्रेसतर्फे कोरोना योद्ध्यांचा व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तर्फे भाटनगर पत्रा शेड लींक रोड प्रभागां मध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त ७५ वे ध्वजारोहण सौ लताताई ओव्हाळ माजी सभापती शिक्षण मंडळ महानगरपालिका व आयु. सुंदर कांबळे शहराध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या हस्ते करण्यात आले .
तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला व “व्यर्थ न हो बलिदान” या संकल्पने अंतर्गत असंघटित कामगार काँग्रेसतर्फे कोरोना योद्ध्यांचा व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस सौ लताताई ओव्हाळ माजी सभापती शिक्षण मंडळ महानगरपालिका यांचा सत्कार आयु सुंदर कांबळे शहराध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्राशेड लिंक रोड पुनर्वसन मध्ये काही अडचणी आल्या तर आम्ही त्या शासन दरबारी मांडून मान्य करून घेऊ व येथील सर्व सदनिकाधारकांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देऊ असे आश्वासन सौ. लताताई ओव्हाळ यांनी दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू परदेसी, राजू खैरारिया, फुले-शाहू-आंबेडकर सोसायटीचे चेअरमन अशोक गायकवाड, शेखर जगताप, रामाभाऊ डोंगरे, देविदास साळवे ज्योती सूर्यवंशी, संगीता पवार कुसुम झिंजुर्डे, अशोक साबळे अब्दुल मुलानी, मोहन उनवणे कुसुम भोळे, गीता सकट, राही बाई कसबे तसेच पत्राशेड लिंक रोड परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते