समितीचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके तर सचिव तहसीलदार मधुसूदन बर्गे
शबनम न्यूज | मावळ
मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव नगर पंचायतीची दक्षता समिती स्थापन झाली. या दक्षता समिती मध्ये राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेलचे आफताब सय्यद यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्वत्र आफताब सय्यद यांचे अभिनंदन होत आहे.
वडगाव नगरपंचायत दक्षता समिती अध्यक्ष आमदार सुनील शेळके आहे. तर सचिव तहसीलदार मधुसूदन बर्गे आहेत. तसेच इतर 11 सदस्य या समितीमध्ये काम करणार आहे .याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश दिले. आफताब सय्यद हे राष्ट्रवादी च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम मावळ मतदार संघामध्ये राबवीत असतात. त्यांच्या नेतृत्वात त्यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करून पक्षाला मजबूती देण्याचे काम केले आहे. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांची दक्षता समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. यावर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना दिलेल्या जबाबदारीचे समाधान व्यक्त करीत आमदार सुनील शेळके यांचे आभार व्यक्त केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी वडगाव नगरपंचायतीची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आमदार सुनील शेळके यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही समिती जाहीर केली आहे.