शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा च्या चिटणीस पदी गणेश रामराव ढाकणे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीचे पत्र पिंपरी चिंचवड भाजप शहराचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे , संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी शहर संघटक अमोलजी थोरात ,जिल्हा सरचिटणीस राजू भाऊ दुर्गे, नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, ओबीसी मोर्चा सरचिटणीस कैलास सानप ,कार्यकारणी सदस्य गणेश वाळुंजकर, विशाल वाळुंजकर आदी प्रमुख उपस्थित होते. नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे की, गणेश ढाकणे यांचे आजपर्यंतचे सेवाभावी कार्य पाहता भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांमध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याची त्यांना संधी देण्यात आली आहे तसेच पक्षाचे काम ते चांगल्या प्रकारे करून जनसेवा व भारतीय जनता पार्टी चा प्रचार प्रसार करतील व मिळालेल्या संधीचे सोने करतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर गणेश ढाकणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत आजपर्यंत केलेल्या कामाची पावती मिळाली असल्याची भावना व्यक्त केली.