शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सेवानिवृत्त एअर मार्शल भुषण गोखले तसेच त्यांच्या पत्नी मेघना गोखले यांना आदर्श माता-पिता सन्मान देऊन सन्मानित केले.
Advertisement
Advertisement
Advertisement
बन्सी रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्ट यांच्या वतीने हा सन्मान राजभवन पुणे येथे मंगळवारी (दि. १७) प्रदान करण्यात आला. सैन्य दलातील सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकाऱ्यांना समाजसेवा व देशसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान प्रतिवर्षी देण्यात येतो.
Advertisement
Advertisement
यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया, सुर्यदत्त समुहाचे अध्यक्ष डॉ संजय चोरडिया, सिद्धांत चोरडिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
Advertisement
Advertisement