पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित पुनावळे येथील कचरा डेपो च्या आजूबाजूची हजारो एकर जागा बांधकाम व्यवसायिकांनी घेतली आहे ही जागा कचरा डेपोसाठी आरक्षित आहे सदरची जागा पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश यांच्या मदतीने त्वरित मिळवून त्या जागी कचरा डेपो सुरू करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे
दिलेल्या निवेदनात धुराजी शिंदे यांनी नमूद केले आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित पुनावळे येथील कचरा डेपोच्या आजुबाजूची हजारो एकर जागा मोठमोठ्या बांधकाम व्यवसायिक व राजकारण्यांनी घेतली आहे . त्यामुळे पुनावळे येथे ७४ एकर जागेवर कचरा डेपोचे आरक्षण असून ही जागा ताब्यात देण्यासाठी व येथे कचरा डेपो सुरू करण्यासाठी गेली २० वर्षे विरोध होत आहे . मा . आयुक्त साहेब आपण डॅशिंग मनपा आयुक्त आहात त्यामुळे दुसरे डॅशिंग पिंपरी — चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश साहेब यांची मदत घेवून पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घ्या व लवकरात लवकर आधुनिक पध्दतीचा कचरा डेपो सुरु करा . पिंपरी – चिंचवड महापालिकेत १ ९९ ७ ला पुनावळे गांव समाविष्ट करण्यात आले . त्यानंतर तेथील ७४ एकर जागेवर कचरा डेपोचे आरक्षण टाकण्यात आले हि जागा वनखात्याची असल्याने त्या जागेचा मोबदला म्हणून ४ कोटी रूपये महापालिकेनेशासनाला जमा केले आहेत .
तसेच जागेचा पर्याय म्हणून पिंपरी सांडस येथील जागा वनखात्याला दिली आहे . मात्र गेली २० वर्षे पुनावळे कचरा डेपोच्या आजुबाजुला हजारो एकर जमीन कवडीमोलाने घेणारे बांधकाम व्यवसायिक व काही धुर्त राजकारणी हा कचरा डेपो होऊ नये म्हणून गेली २० वर्षे प्रयत्न करीत आहेत व प्रशासन त्यांच्या विरोधाला बळी पडत आहे . त्यामुळे मा . आयुक्त साहेब आपण पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश साहेब यांची मदत घेवून या कचरा डेपोची जागा ताब्यात घ्यावी व लवकरात लवकर पुनावळे येथील कचरा डेपो सुरू करावा व मोशी येथील कचरा डेपोवरचा ताण कमी करावा असे धुराजी शिंदें यांनी म्हंटलेआहे.