शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारत सरकार रक्षा मंत्रालय यांनी ॲागस्ट २०१८ ला बोपखेल पुलाच्या कामाला तत्वता: मान्यता दिली होती बोपखेल गावाच्या हद्दीत असणार्या जागेतून पुलाच्या कामास सुरवात झाली, त्यानुसार बोपखेल हद्दीत ३०% काम पुर्ण झाले आहे व उर्वरित ७०% काम हे नदिच्या पलिकडे असणार्या रक्षा मंत्रालयाच्या हद्दीतील जागेत असल्याने तिथं काम सुरु करण्यासाठी रक्षा मंत्रालयाचे working sanction order मिळवावे लागते, ते working sanction न आल्यामुळे बोपखेल पुलाचे पुढील काम रखडले आहे.
भारत सरकारच्या नियमा प्रमाणे तत्वत:मान्यता असणार्या कामास ६ महिन्याच्या आत working sanction order देणे बंधनकारक आहे, भारत सरकारच्या तत्वत: मान्यतेला दोन वर्षे होऊन गेल्या नंतरही अद्याप पर्यंत working sanction आले नाही. लवकरात लवकर working sanction मिळावे याकरिता मावळ लोकसभेचे खासदार श्री.श्रीरंग (आप्पा) बारणे यांना बोपखेल शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले, याप्रसंगी सरीता साने ( पिंपरी विधानसभा महिला संघटिका) प्रतिक्षा घुले ( युवतीसेना प्रमुख पिंपरी विधानसभा), श्री रवि कोवे ( दक्षता समिती सदस्य) शैला पाचपुते (उपशहर संघटिका),माऊली जगताप (चिंचवड विधानसभा अधिकारी) ह.भ.प.लक्ष्मण घुले ,युवासेनेचे उपविभाग अधिकारी सनी कड उपस्थित होते. यासमयी खासदार बारणे असे म्हणाले की ते DGD New Delhi यांच्याशी चर्चा करुन working sanction मिळवून देऊ व बोपखेल पुलाचे काम युद्धपातळीवर चालु करण्यासाठी प्रयत्न करणार व बोपखेलचा प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन दिले खासदार आप्पा बारणे यांनी दिले.