शबनम न्युज | पिंपरी | पुणे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक दोन मध्ये विद्यमान नगरसेवक वसंत बोराटे यांच्या माध्यमातून विकास कामांना गती मिळाली आहे त्यांच्या सततच्या अविरतपणे पाठपुरावा मुळे प्रभागातील गंधर्व एक्सलन्स रस्त्याचे काँक्रिटीकरण उद्घाटन भोसरी विधानसभेचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी आमदार महेश लांडगे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना नगरसेवक वसंत बोराटे यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
Advertisement
यावेळी प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते प्रभागात नगरसेवक वसंत बोराटे यांच्या माध्यमातून वेगाने होत असलेल्या विकास कामाबद्दल प्रभागातील नागरिकांनी हि समाधान व्यक्त केले तसेच ज्या कार्यपद्धतीने व तत्परतेने नगरसेवक वसंत बोराटे प्रभागात विकासकामे करीत आहे याचेही नागरीकांनी कौतुक केले.