शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांना ठेकेदारामार्फत लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आज महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा. या सभा वेळी विरोधक राष्ट्रवादी, शिवसेना वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
‘भ्रष्टाचारी भाजपा धिक्कार असो’ अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी व शिवसेना वतीने निषेध करण्यात येत आहे. तसेच सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने सुरू असून या सभेत अनेक विषय मंजूर करण्यात येत आहे. व विरोधकांना बोलण्यास मनाई करण्यात आल्याने विरोधकांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून महापौरांच्या दालनात राष्ट्रवादी शिवसेनेचे सर्व नगरसेवक या आंदोलनाला बसले आहेत.
या आंदोलनात विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर, नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका मंगलाताई कदम, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक संजय वाबळे ,नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेवक मयूर कलाटे, शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले, नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेवक राहुल भोसले, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक श्याम लांडे , नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक विनोद नढे, नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका वैशालीताई घोडेकर, नगरसेविका स्वाती माई काटे,नगरसेविका उषा वाघेरे, नगरसेविका संगीता ताम्हणे, नगरसेविका उषा काळे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, नगरसेवक समीर मासुळकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.