पुणे, दि. 20 : पुणे विभागातील 18 लाख 43 हजार 921 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 12 हजार 297 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 952 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 39 हजार 424 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.42 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 2 हजार 259 रुग्णांपैकी 10 लाख 75 हजार 261 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 551 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 447 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.55 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 32 हजार 939 रुग्णांपैकी 2 लाख 18 हजार 985 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 265 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 689 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 88 हजार 162 रुग्णांपैकी 1 लाख 78 हजार 654 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 796 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 712 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 87 हजार 53 रुग्णांपैकी 1 लाख 77 हजार 84 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 40 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 1 हजार 884 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 937 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 300 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 647 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 56 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 12, सातारा जिल्ह्यात 750, सोलापूर जिल्ह्यात 628, सांगली जिल्ह्यात 490 तर कोल्हापूर जिल्ह्यात 176 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.