शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांना अँटिकरप्शन ब्युरो वतीने लाचप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्यासह आणखीन पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना शनिवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज सकाळी 11 वाजता शिवाजीनगर कोर्टामध्ये नितीन लांडगे यांना हजर केले असता, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यांना सोमवारी पुन्हा कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांना 18 ऑगस्ट रोजी अँटीकरप्शन ब्युरो चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत चौकशी करीत अखेर अटक केली. सर्व आरोपींना 19 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी शनिवार पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला त्यांना परत सोमवारी कोर्टात हजर राहावे लागेल.