शबनम न्यूज | पुणे
रक्षाबंधन हा भारतीयांचा पवित्रा चा सण भाऊ व बहिण यांच्या पवित्र नात्याचे घट्ट असे नातेसंबंध दाखविणारा हा सण म्हणजे रक्षाबंधन या रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुणे शहरातील सामाजिक संघटना कर्तिकेयंस जनसेवा फ़ाउंडेशन वतीने पुणे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांना राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला पुणे महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना कर्तिकेयंस जनसेवा फ़ाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष Adv मोनिका गावडे खलाने यांनी राखी बांधून हा सण साजरा केला
यावेळी Adv मोनिका गावडे खलाने यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की एक सामाजिक भावनेतून आपण रक्षाबंधनाच्या निमित्ताने सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधली आहे रक्षाबंधन हा पवित्र बहिण-भावाचा सण आहे या निमित्ताने सर्व सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून मी या पवित्र सणाच्या निमित्ताने एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्तिकेयंस जनसेवा फ़ाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष advमोनिका गावडे खलाने या भाजपा – महिला उपाध्यक्ष प्रभाग क्रमांक पंधरा कसबा मतदार संघ व महिला अध्यक्ष – ऑल इंडिया अँटिकरप्शन बोर्ड पुणे जिल्हा या पदावर ही कार्यरत आहेत
यावेळी पुणे महानगर पालिकेचे अनेक सफाई कर्मचारी उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत Adv मोनिका गावडे खलाने यांचे आभार व्यक्त केले व आनंदाने हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला