शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय स्वतंत्र दिन तसेच समाजसेवक वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसा निमित्त एक दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जपान कराटे डो नोबुकवा हा शितो रियो काय च्या वतीने करणेत आलेत होते .
या शिबिराला 20 हुन अधिक मुलांनी सहभाग नोंदवाला व या मधील हर्षद पाटील हा ब्लॅक बेल्ट परीक्षेत यशस्वी रित्या उत्तीर्ण झाला व त्याला जपान चे प्रमाणपत्र सन्मान पूर्वक देण्यात आले
या शिबिराचे उदघाटन माजी पिंपरी कोर्टाचे सचिव मुकुंद ओव्हाळ यांनी केले तसेच शिबिरा ची सांगता समाजसेवक, वृक्षमित्र, अरुण पवार यांनी स्पर्धक, मुली, मुलांना सन्मान प्रमाण पत्र देऊन शुभेच्छा दिल्या
या मुलांना जपान चे 6th डॅन ब्लॅक बेल्ट,भारताचे मुख्य प्रशिक्षक जे.के.एन.एस.के नरेश शर्मा सर, तसेच महाराष्ट्राचे जे.के.एन.एस.के प्रतिनिधी कमलेश पांडे यांनी प्रशिक्षण दिले
या शिबिराचे नियोजन हे आर जे स्पोर्ट्स अकॅडेमी रोहीत जाधव यांच्या वतीने करण्यात आले होते .