पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यासह चार आरोपींना एसीबी कडून ताब्यात घेण्यात आले एका ठेकेदारामार्फत लाच स्वीकारल्या प्रकरणी 18 ऑगस्टला सभापती नितीन लांडगे व पालिकेचे चार कर्मचारी यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली
जाहिरात होर्डिंगचा विषय मंजूर करण्यासाठी 6 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एजन्सी चालकाच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे करण्यात आली होती. तक्रारी अर्जावरून बुधवार दि 18 ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते त्यांना आज दुपारी 1 च्या दरम्यान पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने आरोपी व फिर्यादी दोन्ही वकिलांचे म्हणणे ऐकून नितीन लांडगे यांची सुटका केली
तर ,ज्ञानेश्वर पिंगळे,विजय चावरीया,राजेंद्र शिंदे व अरविंद कांबळे या चार कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे