शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख व संचालक श्री. विजय खळदकर यांच्या मातोश्री कै.कृष्णाबाई वामनराव खळदकर यांचे सोमवार दि. १६.०८.२०२१ रोजी वयाच्या ८१ व्या. वर्षी दु:खद निधन झाले.
तसेच त्यांचेच वडील कै.वामनराव बाळासाहेब खळदकर याचे गुरुवार दि. १९.०८.२०२१ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी दु:खद निधन झाले.
या दोघांचा दशक्रिया विधी हा बुधवार दि. २५.०८.२०२१ रोजी सकाळी ९ वाजता भोसरी येथे तळ्याकाठी होईल.
खळदकर कुटुंबीयावर जो दु:खद प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद परमेश्वराने या कुटुंबियांना देवो, मृत आत्म्यास चिरशांती मिळो अशी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सर्व पदाधिकारी, संचालक, स्वीकृत संचालक, सल्लागार, सभासद यांचे वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना.