शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय भाषेचा वापर करत आहेत. हा केवळ मुख्यमंत्र्यांचा नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. हा अपमान कदापि सहन होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा केली होती. त्याबद्दल नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री @MeNarayanRane हे मा. मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याबद्दल अशोभनीय भाषेचा वापर करत आहेत. हा केवळ मुख्यमंत्र्यांचा नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. हा अपमान कदापि सहन होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री ना. @nawabmalikncp यांनी दिली आहे. pic.twitter.com/y8m68jIs8z
— NCP (@NCPspeaks) August 24, 2021
भाजपने पश्चिम बंगालमध्ये हिंसक राजकारण करून तेथील वातावरण बिघडवण्याचे काम केले. असेच राजकारण भाजप महाराष्ट्रामध्ये करू इच्छित आहे. पण ते महाराष्ट्रातील जनता कधीही स्वीकारणार नाही. ही भाषा आणि राजकारण महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही हे भाजपाला कळले पाहिजे. लोकांना कळले पाहिजे की कायद्यापेक्षा कोणी मोठं होऊ शकत नाही. कितीही मोठी व्यक्ती असली तरी त्याच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाई होईल, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.