शबनम न्युज | पुणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राणे यांनी रायगड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा केली होती.राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.दरम्यान रत्नागिरी पोलिसांकडून राणे यांना अटक करण्यात आली आहे.
नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. नारायण राणे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुन्हे रद्द करण्याच्या आणि अटकेपासून दिलासा देण्याच्या मागणीसाठी नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात केली होती. नोटीस न देताच अटकेच्या करवाईचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र कोर्टाने योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश वकिलाला देत तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता.