शबनम न्युज | नवी दिल्ली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज पोलिसांनी अटक केली आहे.त्यामुळे नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईनंतर भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भात ट्वविट केले आहे.
महाराष्ट्र सरकार द्वारा केंद्रीय मंत्री नारायण राणे जी की गिरफ़्तारी संवैधानिक मूल्यों का हनन है। इस तरह की कार्यवाही से ना तो हम डरेंगे, ना दबेंगे।
भाजपा को जन-आशीर्वाद यात्रा में मिल रहे अपार समर्थन से ये लोग परेशान है।
हम लोकतांत्रिक ढंग से लड़ते रहेंगे, यात्रा जारी रहेंगी।Advertisement— Jagat Prakash Nadda (@JPNadda) August 24, 2021
ट्विटमध्ये जे.पी. नड्डा म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणेंची केलेली केली अटक ही घटनात्मक मूल्यांचे हे हनन करणारी आहे. या प्रकारच्या कारवाईमुळे आम्ही ना घाबरणार, ना दबून राहणार. भाजपला जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ही मंडळी त्रस्त आहे. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून लढत राहू, जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील, असे जे.पी. नड्डा म्हणाले.