शबनम न्युज | देहूरोड
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्र.१६,मधील देहूरोड(किवळे)पोलीस स्टेशनला संगणक व प्रिंटर भेट देण्यात आले.
यावेळी कोविड योध्दे विलास सोंडे साहेब (वरिष्ठ पोलीस निरिक्षक),श्री.देशमुख साहेब(पोलीस निरिक्षक)यांचा सत्कारही करण्यात आला.कोविड कालावधीपासून पोलीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र करत असलेले परिश्रम,त्यांचा कार्यावरील त्रास कमी व्हावा,कामकाज सूसुत्रता व सोप्या पद्धतीने सहज पार पाडावे हा उद्देश असल्याचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमप्रसंगी बाळासाहेब ओव्हाळ(नगरसेवक),बिभीषण चौधरी(स्विकृत नगरसेवक),कातशेठ भोंडवे उद्योजक,अनिलभाऊ चव्हाण पिं.चिं.शहर भाजपा.आदेशजी नवले उद्दोजक,अलकाताई पांडे,सुरेशजी नायर,स्नेहाताई गाडे,संगिता कुवर,रेश्मा पाटील,चंद्रिका कनक,नंदा मुंद्रे,प्रकाश आखाडे,विक्रांतशेठ भोंडवे,राजाभाऊ ओव्हाळ,शिद्धेश्वर ठाकरे,गाडे,उपस्थित होते.