युवा नेते प्रज्योत अनिल फुगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
भोसरी | प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील युवानेते प्रज्योत अनिल फुगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच भोसरी विधानसभेचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी आमदार महेश लांडगे यांनी प्रज्योत अनिल फुगे यांच्या वतीने होत असलेल्या सामाजिक उपक्रमांचे व त्यांच्या मार्फत होत असलेल्या सामाजिक कामांचे कौतुक केले.
तसेच प्रज्योत अनिल फुगे यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयामार्फत मिळणाऱ्या या योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले
प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांना या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळणार आहे या जनसंपर्क कार्यालयामार्फत प्रथमतः नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे तसेच या जनसंपर्क कार्यालयामार्फत नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येणार असून प्रभागातील नागरिकांच्या अनेक अडीअडचणी सोडविण्याचे काम आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या मार्फत होणार असल्याची माहिती प्रज्योत अनिल फुगे यांनी दिली.
या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार सोपान फुगे, बाळासाहेब गव्हाणे, भानुदास फुगे, ह. भ. प. राजाराम फुगे, सोपान फुगे, सतीश फुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच यावेळी प्रभागातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते , उद्घाटनाचा कार्यक्रम प्रसंगी विजय फुगे, सतीश फुगे, नारायण फुगे, ज्ञानेश्वर फुगे, सोपान फुगे, अनिल फुगे, बाळासाहेब फुगे ,अतुल फुगे, तसेच समस्त फुगे परिवार वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले