शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी | दीपक आवळे
पुणे प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ पुणे मनस्वी आणि भारत विकास परिषद मुकुंदनगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिळून साऱ्या जणी, धम्माल करू मंगळागौर खेळुनी’ हा खास उपक्रम पुण्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी यांसाठी राबवण्यात आला. एक भावनिक आणि विश्वासाचं नातं निर्माण व्हावं हा त्या मागचा उद्देश होता. या कार्यक्रमाचे संयोजन अभिनेत्री आणि प्रबोधनकार मेघना झुझम, तृतीयपंथी सोनाली दळवी आणि पुणेरी प्राईड फाउंडेशन अध्यक्षा तृतीयपंथी मयुरी बनसोड यांनी केले होते.
याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुणे मनस्वी प्रेसिडेंट रेखा आखाडे, सेक्रेटरी सुनंदा डेरे, ट्रेझरर धनश्री आठल्ये, चार्टर प्रेसिडेंट भाग्यश्री चौंडे, भारत विकास परिषद मुकुंद नगर शाखा सेक्रेटरी अॅड भाग्यश्री पाटील, ट्रेझरर राज्यश्री शितोळे, शाल्मली बेल्हेकर, सूष्मा कोंडे देशमुख, माजी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, नगरसेविका स्मिताताई वस्ते आदी उपस्थित होते.
समवयस्क मैत्रिणींना, नातेवाईकांना जमवणे, गाणी, वेगवेगळे खेळ, थट्टामस्करी, खाणेपिणे, मैत्रिणींबरोबर जागरणे या सगळ्याला स्त्रियांच्या भावविश्वात खास श्रावण हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा पवित्र महिना. ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ या कवितेतील वर्णनाप्रमाणे श्रावण हा कुंद पावसाचा मन प्रफुल्लित करणारा महिना. अशाच प्रफुल्लित चित्तवृत्तींनी येते श्रावणातील मंगळागौर.
पहिल्यांदाच मंगळागौरी मध्ये खेळायला मिळाल्यामुळे तृतीयपंथीयांनी आनंद व्यक्त केला. नऊवारी साडी घालून आलेल्या तृतीयपंथी यांचं फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. ट्रॉफी देऊन सन्मान ही करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना झुझम यांनी केले होते.