शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. यामुळे त्यांचा जेलमधील मुक्काम आता वाढणार आहे.
जाहिरातीचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडून 1 लाख 18 हजार ची लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समितीच्या अध्यक्षांसह पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. याप्रकरणी पाच जणांना दोन वेळा पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी न्यायालयास अंतरिम जामीन मिळण्यासाठी आजीचे निधन झाल्याची खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लांडगे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अंतरिम जामीन ना मंजूर झाल्याने लांडगे यांची न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या अन्य १५ सदस्यांची चौकशी कऱण्याचे फर्मान निघाले आहे.