शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे जिल्हयातील ग्रामीण युवक / युवतींना कृषि विज्ञान केंद्र, बारामती, नारायणगाव, तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक / सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधुन त्वरीत नोंदणी करण्याचे आत्माचे प्रकल्प संचालक यांनी आवाहन केले आहे.
राष्ट्रीय कौशल्य विकास व उद्योजकता धोरण – 2015 अंतर्गत ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे हा कार्यक्रम राबविणेसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील युवकांना/महिलांना स्थानिक गरजेनुरुप कृषि व कृषि पुरक व्यवसाय विषयक प्रशिक्षण देणेसाठी तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणेसाठी ग्रामीण युवकांना कौशल्य आधारीत प्रशिक्षण देणे हा कार्यक्रम राबविणेत येत आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी 7 दिवसाचे (6+1 प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी करीता प्रवास), प्रशिक्षण वर्ग क्षमता 15 प्रशिक्षणार्थी प्रति वर्ग (कृषि व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार यांच्या सुचनानुसार विशेष घटक योजनेंतर्गत अनु. जाती-4, अनु.जमाती-3 व उर्वरित सर्वसाधारण घटक-8 या प्रमाणात युवकांची निवड करण्यात येणार आहे)
सन 2021-22 अंतर्गत पुणे जिल्हयासाठी वरील निकषांनुसार दोन प्रशिक्षण कार्यक्रमांस मंजुरी मिळालेली आहे व नोडल प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आलेली आहे.
प्रशिक्षण संस्थेचे नाव, विषय व कालावधी
- कृषि विज्ञान केंद्र – नारायणगाव, कौशल्य प्रशिक्षणाचा विषय – मधुमक्षिकापालन, प्रशिक्षण कालावधी – माहे सप्टेंबर 2021
- कृषि विज्ञान केंद्र – बारामती, कौशल्य प्रशिक्षणाचा विषय – मधुमक्षिकापालन, प्रशिक्षण कालावधी – माहे ऑक्टोबर 2021
-
संपर्क क्रमांक –
Advertisement- कृषि विज्ञान केंद्र, बारामती डॉ. मिलिंद जोशी – 9975932717
- कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव डॉ. दत्तात्रय गावडे – 7020216453
- प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे – 020-25530431