शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नव्याने ताब्यात घेतलेली प्रसन्न धाम सोसायटी मागील मोकळ्या जागेत शिक्षण विषयक जनजागृती करणारे उद्यान उभारावे, अशी मागणी शिक्षण समिती सभापती मनीषा प्रमोद पवार यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
यशस्वी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे शिक्षण शिक्षणामुळे मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणामुळेच मानव यशाच्या शिखरावर आपली प्रगती करत असतो. मानवाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी शिक्षण हे महत्त्वाचे असते. आपल्या देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनविण्यासाठी युवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे अति आवश्यक आहे. याकरिता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिक्षणाची जनजागृती करणारे उद्यान उभारावे, यासाठी मनपाने नव्यानेच ताब्यात घेतलेली असून, धाम मागील मोकळ्या जागेत हे शैक्षणिक उद्यान उभारावे, अशी मागणी शिक्षण समिती सभापती मनीषा पवार यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.