शबनम न्युज | दिघी
पुणे | प्रतिनिधी
सध्या दिघी मध्ये डेंगू सदृश्य लक्षणे असलेले ताप,अंगदुखी, सर्दी, पडसे, डोकेदुखी व इतर साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सरकारी व खासगी दवाखान्यात अशा रुग्णांची संख्याही वाढली आहे.
डासांची मोठ्या प्रमाणात उत्पती होत आहे.डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे आणि साथीच्या आजारामुळे सर्वसामान्य जनता त्रासून गेली आहे.कोरोनाचे संकट असताना आता डेंगू व इतर साथीच्या आजारांनी नागरिकांचे जगणे मुश्किल केले आहे.
त्यामूळे सध्या वाढत असलेले साथीचे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परिसरामध्ये धुर फवारणी तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष ठेवुन ठोस उपाय योजना करण्यात याव्यात, तसेच साथीचे आजार वाढणार नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पिं.चिं चे पदाधिकारी मंगेश शिवाजी असवले व आसिफ रज्जाक शेख यांनी मनपा च्या आरोग्य विभागाला दिले.