शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांचे पालिकेच्या सेवेप्रती योगदान अनमोल असून त्यांच्या कार्यामुळे महापालिकेचा पाया मजबूत झाला आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
माहे ऑगस्ट २०२१ नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे १९ तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले ५ अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कार समारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सुप्रिया सुरगुडे, निलेश घुले, तुषार काळभोर, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, देवेंद्र मोरे उपस्थित होते.
माहे ऑगस्ट २०२१ नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या मेट्रन मोनिका चव्हाण, मुख्याध्यापक सुनिता इसकांडे, हनुमंत मारणे, कार्यालयीन अधिक्षक सुजाता गोले, संजय चव्हाण, सहा. उद्यान निरिक्षक तारु राजेंद्र, उपशिक्षक प्राजक्ता आल्हाट, मीना परदेशी, उज्वला सावंत, मनिषा पुणेकर, सिताराम बालकोळी, ए. एन. एम. मंगला गायकवाड, सहाय्यक शिक्षक अश्विनी चौधरी, मिटर निरिक्षक विकास शेंडे, दूरध्वनी पर्यवेक्षक संजय शिरसाट, वायरमन मेघश्याम बडवे, वाहनचालक विजय दौंडकर, शिपाई गोकूळ होले, रखवालदार लहू आढारी यांचा समावेश आहे. तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले वैद्यकिय अधिकारी प्रितमकुमार कदम, कार्यालयीन अधिक्षक मनिषा देशपांडे, उपशिक्षक कल्पना पिंगळे, सफाई कामगार उल्का सोनवणे, गटरकुली महानंदा सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.
माहे मार्च २०२१ नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले १५ अधिकारी आणि कर्मचारी आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले ७ कर्मचा-यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला नव्हता त्यांचाही आज सत्कार करण्यात आला. त्यामध्ये जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, सहा. आरोग्याधिकारी धाकोजी शिर्के, फिजीओथेरेफिस्ट जयश्री कोतवाल, उपलेखापाल सुनिल तापकीर, मुख्य लिपिक विनायक काळभोर, शंकर टाकळेकर, असि. मार्केट इन्सपेक्टर क्लार्क वंदना ताटे, लिपिक मंगला पांचाळ, वीज पर्यवेक्षयक रमेश कंद, मजूर सुरेश पवार, प्रकाश परब, चंद्रकांत भगत, आया विमल उर्फ वैशाली निळे, सफाई कामगार नंदा पवार, मुक्ताबाई कांबळे, तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले सफाई कामगार शालन रानवडे, रावण पांढरे, सफाई सेवक नवनाथ म्हस्के, संगीता घावरी, कचरा कुली भानुदास खुडे, गटरकुली सुभाष कांबळे, दिलीप चव्हाण यांचा समावेश आहे.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सन्मान करताना हे शहर आदर्श आणि रहाण्यायोग्य करण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी देखील सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या आणि महानगरपालिकेत सातत्य, सचोटी आणि प्रामाणिकपणे केलेल्या त्यांच्या प्रदीर्घ सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.