छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थ ने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.
Advertisement