शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात शहाबुद्दीन शेख यांनी नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यावसायिक कामे सुरू आहेत. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी संदर्भात महसूल संबंधी व्यवसाय विकास गतीवर आहेत. अनेक ठिकाणी बिल्डर्स डेव्हलपर्स हे जमीन खरेदी करून त्यातील गौण हे बेकायदेशीरपणे काढून घेऊन त्याचा व्यवसाय करत आहेत. अनेक वेळा तक्रार करून सुद्धा संबंधित अधिकारी तक्रारीची दखल घेत नाही. संबंधित विभागाचे अधिकारी व बिल्डर्स डेव्हलपर्स व व्यावसायिकांचे साटेलोटे यामध्ये सुरू आहेत. त्यामुळे महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणात तोटा होत असून, राज्या चा महसूल अनेक व्यवसायिक बुडवत आहेत. त्यामुळे अशा बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन करून व्यापार करणाऱ्यांवर व महसूल बुडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शहाबुद्दीन शेख यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.