शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
भाजपा पुणे कन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील ज्ञानदेव कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात जीव रक्षक अनेक बाबी कृत्रिमरीत्या निर्माण करता येऊ शकत आहेत परंतु मानवी जीवनास अत्यावश्यक असणारे रक्त कृत्रिम पद्धतीने तयार करता येत नाही एक सुजाण जागृत नागरिक म्हणून सध्याच्या संकटकाळात आपण समाजातील गरजवंतांना युद्धभूमीवर लढणाऱ्या जवानांना रक्तदान करून मोलाची मदत करू शकतो या विचाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
तसेच रविवार दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लक्ष्मी बाजार कुंदन साडी सेंटर समोर, भवानी पेठ पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट भेट देण्यात येणार आहे.
सदर रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.
तसेच सदर रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे.