शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तथा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिलकांबळे यांच्या सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक येथील नवीन जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ व स्नेहमिलनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
याप्रसंगी महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, पुण्याचे खासदार गिरीष बापट, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे, पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी मान्यवरांबरोबरच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सर्वश्री पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अध्यक्ष महेश पुंडे, सरचिटणीस उमेश शिंदे, संतोष इंदुलकर, विशाल कोंडे, विशाल दरेकर, सुशांत निगडे यांनी केले होते.