शबनम न्युज | सातारा
फलटण | प्रतिनिधी
आज फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयास भेट देऊन या महाविद्यालयांच्या कामकाजाची खासदार राष्ट्र वादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती घेतली. तसेच गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या वतीने मुरघास उत्पादन व मुक्त संचार गोठा पद्धतीची सविस्तर माहिती डॉ. शांताराम गायकवाड यांनी शरद पवार यांना यावेळेस दिली. सदर कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या जमिनीबाबत काही समस्या राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. याबाबत लवकरच महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा करून आगामी काळात प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे उपस्थितांना शरद पवार यांनी आश्वासित केले.
या वेळी विधान परिषदेचे सभापती श्री. रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. बाळासाहेब पाटील, आमदार श्री. दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्री. शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, बारामती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. सदाशिव सातव (बापू) उपस्थित होते.