पुणे, दि. 03 :- पुणे विभागातील 18 लाख 84 हजार 724 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 49 हजार 742 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 752 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 266 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.67 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 17 हजार 486 रुग्णांपैकी 10 लाख 88 हजार 789 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 92 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.43 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 40 हजार 547 रुग्णांपैकी 2 लाख 27 हजार 275 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 223 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 94 हजार 521 रुग्णांपैकी 1 लाख 86 हजार 636 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 46 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 839 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 92 हजार 979 रुग्णांपैकी 1 लाख 84 हजार 906 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 2 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 4 हजार 209 रुग्णांपैकी 1 लाख 97 हजार 118 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 389 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 140 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 969, सातारा जिल्ह्यात 470, सोलापूर जिल्ह्यात 304, सांगली जिल्ह्यात 293 तर कोल्हापूर जिल्ह्यात 104 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 848 आहे. पुणे जिल्हयामध्ये 639, सातारा जिल्हयामध्ये 109, सोलापूर जिल्हयामध्ये 512, सांगली जिल्हयामध्ये 447 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 141 रुग्णांचा समावेश आहे.