- भोसरी विधानसभा मतदार संघात केंद्र सरकारचा जाहीर निषेध
- महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ विरोधात आज शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात तीव्र असे निषेध आंदोलन करण्यात आले. भोसरी विधानसभेत पोस्ट ऑफिस समोर सदर आंदोलन करून पंतप्रधान मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या पोस्टाने पाठवण्यात आल्या व केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. सदरचे आंदोलन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, निरीक्षक सौ उज्वला शेवाळे यांच्या सूचनेनुसार व पुणे जिल्हा निरीक्षक कविता आल्हाट तसेच महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत आहे. यावर केंद्र सरकारला नियंत्रण करता आले नाही, त्यामुळे सामान्य नागरिक अनेक समस्यांचा सामना करीत आहे. मोदी सरकार इंधन दरवाढ रोखण्यासाठी सपशेल अयशस्वी आहे. सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी समस्यांशी केंद्र सरकारचे कोणतेही देणेघेणे राहिलेले नाही. अशा बेजबाबदार सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. अशी प्रतिक्रिया यावेळी कविता आल्हाट यांनी दिली.
यावेळी सौ.कविताताईं आल्हाट(पुणे जिल्हा निरीक्षक),अनुराधा गोफने(विद्यमान नगरसेविका) ,मनिषा गटकळ(अध्यक्षा-भोसरी विधानसभा) ,संगीताताई आहेर-(कर्याध्यक्षा-भोसरी विधानसभा) ,सपना घाडगे(शहरउपध्यक्षा), पूनम वाघ, मनिषा जड़र, सोनम पोटवड़े,सारिका ढमें,सुनीता कालोखे ,मेधा पळशीकर,अंजली हवलदार,वैशाली पवार,ज्योति मधुरकर,संगिता जाधव ,सिंधु जाधव ,स्मिता विधाते,अंजना नाइकनरे,हेमलता कदम, साक्षी देशपांडे, शोभा ओटी आदी उपस्थित होते.