शिक्षक दिनाचे निमित्त साधून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे सोहळे बंद करताना खंत वाटली नाही का असा सवाल भाजपा आमदार महेशदादा लांडगे यांनी राज्य सरकारला केला आहे.या सवालाचे उत्तर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविका मुख्याध्यापिका प्रियांका बारसे यांनी उत्तर दिले आहे.
पाच वर्षांमध्ये सतत शिक्षण सभापती पदी माझी नेमणूक करा मला स्वतःला शिक्षण क्षेत्राच्या 35 वर्षाचा मुख्याध्यापक पदाचा व प्रशासनाचा अनुभव आहे असे सांगून लेखी पत्र देऊनही पाच वर्षात एकदाही भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवड शहराच्या शिक्षण समितीच्या सभापतिपदी नेमणूक केली नाही.
मागील पंधरा दिवसांपूर्वीच आता शेवटचे सहा महिने राहिलेले आहेत आता तरी मला संधी द्या असे लेखी पत्र शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांना नगरसेविका प्रियांका बारसे यांनी दिले होते .
या पत्रामध्ये मी पक्षाचे व प्रभागाचे प्रामाणिकपणे काम केलेले आहे आपण मला या पदी संधी द्यावी अशी मी आपणाला विनंती करत आहे असा विनंतीवजा अर्ज देऊनही पक्षाने आणि शहराध्यक्ष महेश दादा लांडगे यांनी शिक्षण सभापती पदी संधी दिलेली नाही. त्यामुळे महेश दादा लांडगे यांना राज्य सरकारला शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार दिलेला नाही अशी खंत व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही असे नगरसेविका प्रियांका बारसे यांनी स्पष्टपणे म्हटलेले आहे.
तसेच पिंपरी-चिंचवड शहराला खरंच बापाची गरज आहे असे नगरसेविका प्रियांका बारसे यांनाही वाटते कारण फक्त स्थानिक पातळीवर भोसरी आणि पिंपरी-चिंचवड पुरतेच नात्यागोत्यात राजकारण फिरत असून या ठिकाणी काम करणार्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नगरसेवकांना न्याय मिळत नाही अशी भावना त्यांनी या पाच वर्षात नेहमी व्यक्त केलेली आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
नगरसेवकच नव्हे तर नगरसेवकांच्या समस्या समस्यासुध्दा पक्षाच्या वरीष्ठांपर्यंत पोहचत नाही