शबनम न्यूज | पुणे
LIC च्या ६५ वर्ष पुर्ती निमित्त युनिट नं – ७४७३, शाखा क्रं : ९२ H ठाणे च्या वतीने LIC PREMIUM LEAGUE स्पर्धेचे १६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते.
ह्या स्पर्धेत सहा टिम सहभागी झाल्या होत्या .
१) कल्याण २ ) दिवा ३ ) ठाणे ४ ) नवी मुंबई ५ ) वेस्टर्न ६ ) डोंबिवली
या स्पर्धेत कल्याण विभागाने सर्वात जास्त महसुल मिळवून चषकावर नाव कोरले. कॅप्टन श्री महेंद्र चौधरी व व्हा.कॅप्टन नंदिनी राजापुरकर आणि सर्व टिम ने जल्लोष करत ट्रॉफी स्विकारली ! त्यासोबत वैयक्तिक स्पर्धाचेंही आयोजन करण्यात आले होते.
सौ. नंदिनी राजापुरकर यांना टू स्टार ट्रॉफी तर श्री. धाकुंद कर्डेकर व श्री रुपेश सिंग यांनी थ्री स्टार ट्रॉफीवर शिक्का मोर्तब उमटवले .
पारितोषिक वितरण सोहळ्याला इग्रंजी प्रशिक्षक, साहित्यिक, डॉ. मधुसूदन घाणेकर ब्रम्हध्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रा. नागेश हुलवळे सर अध्यक्ष म्हणून व LIC शाखा क्रं 92 H चे व्यवस्थापक श्री सुनिल भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री सुनिल भोसले यांनी भविष्यातील LIC चे फायदे व संधी यावर मार्गदर्शन केले ,तर प्रा. नागेश हुलवळे यांनी LIC एक उत्तम व विश्वसनीय राष्ट्रीय संस्था असून देशविकासाठी कार्यरत असल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे आयोजन विकास अधिकारी श्री संदिप गोपाळे यांनी केले होते. त्यांनी कार्यक्रमाचे प्रेरणादायी प्रास्ताविक केले.
ठाणे येथील वुडलॅण्ड हॉटेलच्या प्रशस्त सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक दिनानिमित्ताने ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता
संपन्न झाला.