शबनम न्यूज | बीड
बीड | प्रतिनिधी
बीडमधील आंबेजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करूणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याचबरोबर त्यांच्या वाहनचालकास एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली गेली आहे.
Advertisement
करूणा शर्मा काल परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज त्यांना आंबेजोगाई न्यायालयात हजर करण्यात आलं होतं दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायलयाने वरील निर्णय दिला.
Advertisement
Advertisement