शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी | मोशी
गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा पतीने निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात हातोडा आणि चाकूने वार करून हा खून केला आहे. हि घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास युटोपिया सोसायटी बो-हाडेवाडी मोशी येथे घडली आहे.
सरला विजयकुमार साळवे असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.विजयकुमार गजानन साळवे(रा. प्लॅट नं – 906, 9 मजला युटोपिया सोसायटी बो-हाडेवाडी मोशी) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपी विजयकुमार आणि सरला या दोघांचा दोन वर्षांपूवी प्रेम विवाह झालेला होता .मोशीतील युटोपिया सोसायटी येथे हे पती आणि पत्नी राहत होते. विजयकुमार हा पत्नी सरला हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता . यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडत होते . सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बो-हाडेवाडी मोशी पत्नी सरला गाढ झोपेत असताना पती विजयकुमारने तिच्या डोक्यात हातोड्याने घाव घातला तसेच चाकूने सपासप वार करून खून केला . आरोपी पती विजयकुमार खून करून पसार झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे करीत आहेत.