शबनम न्युज | चिखली
चिखली | प्रतिनिधी
चिखली येथे गुटखा विक्री प्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 73 हजार 85 रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली. गुन्हे शाखा युनिट एक या पथकाने सोमवारी (दि. 6) सकाळी साडेनऊच्या सुमारास जाधव वाडी चिखली येथे ही कारवाई केली.
Advertisement
महेंद्र आत्माराम देवासी (वय 23 रा. हरगुडे वस्ती चिखली) प्रकाश ओगडरामजी देवासी (वय 19 रा.हरगुडे वस्ती चिखली) अंबादास धर्म राठोड (वय 50 रा.जाधव वाडी चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत.याबाबत युनिट एकचे हवालदार महादेव जावळे यांनी फिर्याद दिली. पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत.
Advertisement
Advertisement